घरताज्या घडामोडीपवार राऊत भेट : पवारांनी कोरोना परिस्थितीवर व्यक्त केली चिंता

पवार राऊत भेट : पवारांनी कोरोना परिस्थितीवर व्यक्त केली चिंता

Subscribe

कोरोना परिस्थितीवर संसदेत विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांना देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाटत आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत अर्ध्यातासाहून जास्त वेळ शरद पवारांच्या निवास्थानी होते. तसेच शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांच्याबर राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याबर राजकीय विषयांवर नेहमीच चर्चा होत असते. राजकीय घडामोडींवर, कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली आहे. शरद पवार फार चिंताग्रस्त आहेत. ते सातत्याने देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. असे राऊतांनी सांगितले आहे. रेमडेसिवीर तसेच कोरोना परिस्थितीवरुन अनेक आरोप सरकारवर होत आहेत. परंतु आरोप प्रत्यारोप हे होत असतात परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. सरकारला काहीही होणार नाही असे भाकितही संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

संसदीय अधिवेशनाच्या मागणीबाबत विचारले असता, संजय राऊत यांनी म्हटले आहे की, २ दिवसीय संसदेचे अधिवेशन घ्यावे अशी देशातील सर्वच प्रमुख नेत्यांची भूमिका आहे. संसदेत चर्चा व्हायला पाहिजे तरच परिस्थितीचे आकलन होईल. देशातील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा होईल तसेच पुढची दिशा ठरवण्यात मदत होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या सरकार आणि विरोधी पक्ष हा विषय महत्त्वाचा नसून महाराष्ट्रातील जनतेचे हित हे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाहेर रस्त्यावर नागरिकांची गर्दी आहे का? असे विचारले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच त्यांना थोडी गर्दी दिसते असल्याचे सांगत अजून थोडे नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे असल्याचे सांगितल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -