घर महाराष्ट्र "जिंकेल त्याची जागा" हे मविआचे सूत्र, संजय राऊतांचे जागा वाटपाबाबत स्पष्टीकरण

“जिंकेल त्याची जागा” हे मविआचे सूत्र, संजय राऊतांचे जागा वाटपाबाबत स्पष्टीकरण

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलेले आहे. जिंकेल त्याची जागा असा महाविकास आघाडीने फॉर्म्युला ठरवलेला असून प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपावरील फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मविआ एकत्रच लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मविआमध्ये अंतर्गत वाद असले तरी मविआमधील एकजूट ही मजबूत असल्याचे वारंवार सांगण्यात येत असते. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलेले आहे. जिंकेल त्याची जागा असा महाविकास आघाडीने फॉर्म्युला ठरवलेला असून प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut said that Mahavikas Aghadi has become formula regarding seat allocation)

हेही वाचा – मंत्रिपद का हुकलं?, गोगावलेंनी मांडली कळ आतल्या जिवाची!

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही अत्यंत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची आघाडी आहे. या तीन पक्षांची आघाडी ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे. तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपावर अनेकांना तडजोड ही करावी लागणार आहे आणि ते करायला आमची तयारी सुरू आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.

तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी ठरवले आहे की, जागा वाटपावरून कोणतेही मतभेद उघड करायचे नाही. आपल्याला आधी एकत्र यायचे आहे. निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत. जागेचा हट्ट धरायचा नाही. त्यामुळे जिंकेल त्याची जागा हे आमचे सूत्र ठरलेले आहे, असे स्पष्टपणे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये तर आत्तापासूनच अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. कारण अद्यापही मंत्रिमंडळात 17 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यात शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटातील आमदारांकडून मंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपद दिले न गेल्याने ते याबाबतची नाराजी वारंवार बोलून दाखवत आहे. त्यामुळे ज्यावेळी निवडणुकांमध्ये जागा वाटपाची वेळ येईल, त्यावेळी यांच्यामध्ये होणारा वाद पाहणे नेमके कोणते वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे मात्र मविआ जागा वाटपावरून स्पष्ट असल्याने आता कोणाला किती जागा मिळतात हे पाहावे लागेल. परंतु सध्याची महत्त्वाची बाब म्हणजे येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 6 मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या आधी इंडियाच्या दोन बैठका या पटणा आणि बंगळुरू येथे झालेल्या आहेत. या दोन्ही राज्यात इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांचे सरकार आहे. परंतु महाराष्ट्रात मविआचे सरकार नसतानाही ही बैठक मुंबईत होत असून हे एक मोठे आव्हान असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -