घरमहाराष्ट्रराज्यातील सर्व विद्यापीठांमधील हिंदी भाषेसाठीची शिष्यवृत्ती बंद

राज्यातील सर्व विद्यापीठांमधील हिंदी भाषेसाठीची शिष्यवृत्ती बंद

Subscribe

राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती केंद्र शासनाने स्थगित केली आहे. त्याबाबतचे अर्ज स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व विद्यावेतनामध्ये कपात केली जात असल्याच्या धोरणावर विद्यार्थ्यांकडून कडाडून टीका होत आहे.केंद्र शासनाकडून अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मूल्यांकन अभ्यास सुरू असल्याने पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारू नयेत. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संचालनालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत याबाबतचे कुठलेही अर्ज स्वीकारू नयेत अथवा उच्च शिक्षण संचालनालयाकडे पाठवू नयेत असे परिपत्रक उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी काढले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -