घरमहाराष्ट्रध्वजवंदनेसाठी शाळेत जाणार्‍या चिरमुड्याचा अपघातात मृत्यू

ध्वजवंदनेसाठी शाळेत जाणार्‍या चिरमुड्याचा अपघातात मृत्यू

Subscribe

स्वातंत्र्य दिनी संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असताना औरंगाबादमध्ये मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात ध्वजवंदनेसाठी शाळेत जाताना संभाजी ज्ञानेश्वर शिंदे या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने उडवले आहे. त्यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी घडली.

औरंगाबादमधील झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी भरधाव कारखाली चिरडून संभाजी शिंदे या नऊ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. शाळेतील ध्वजवंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार होता.

- Advertisement -

मात्र, शाळेकडे जात असतानाच त्याला मृत्यूने गाठले. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातामुळे नागरिक संतापले. ते रस्त्यावर उतरले.त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे झाल्टा फाटा ते केंब्रिज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्व वाहतूक बीड बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -