२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू, केंद्राने प्रसिध्द केल्या गाईडलाईन्स पण

Classes 8th to 9th will be held in Corona free village in Maharashtra
राज्यात कोरोनामुक्त गावात ८वी ते ९वीचे वर्ग होणार सुरू

केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली. तरी कोरोनाच्या सद्यस्थिती बघता, राज्यात शाळा सुरू करणे शक्य नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने याबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. पण शिक्षण विभागाने राज्यातील संस्था चालक तसेच शिक्षण तज्ज्ञ यांच्या समवेत चर्चा केली आणि त्यांची मतं जाणून घेतली. यावेळी कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता शिक्षक, संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे.

या विषयी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे तुर्तासतरी इयत्ता दहावी आणि नववीच्या तुकड्या सुरू करण्याचा विचार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीशहरी भागात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असंही गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षण सुरू राहणं गरजेचं

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहणं गरजेचं आहे. शाळा सुरू केल्यास विद्यर्थ्यांना शाळेत बोलवणे धोक्याचं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. येत्या २१ सप्टेंबरपासून इयत्ता ९ ते १२ वी वर्गासाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. तीचे काटेकोरपालन होणे गरजेचं आहे. पालकांच्या संमतीनेचा विद्यार्थी शाळेत येतील. शिवाय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू करण्यास परवानगी असेल. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये.

काय आहेत गाईडलाईन्स

वर्गातही बसण्याची व्यवस्था बदलली जाईल, असे या मार्गदर्शक सूचनात सांगण्यात आले आहे. विद्यार्थी एकमेकांपासून सहा फूट अंतरावर बसतील. म्हणून खुर्ची-टेबलचे अंतर ६ फूट असावे. वर्गातील इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सामाजिक अंतरांची काळजी घ्यावी लागेल. वर्गात मास्क घालणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपापसांत लॅपटॉप, नोटबुक, स्टेशनरी सामायिक करण्याची परवानगी दिली जाणार नाही.


हे ही वाचा – चालू शूटींगमध्ये कोसळला अभिनेता, मदत न मिळाल्यामुळे झाला मृत्यू!