घरमहाराष्ट्ररुबेला लसीकरणादरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग

रुबेला लसीकरणादरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग

Subscribe

याबाबत माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेत पोहचले आणि सदर शिक्षकाला त्यांनी चांगलंच झोडपून काढलं.

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील एका शाळेत सातवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडनेर गंगाई या गावातील जिल्हा परिषद शाळेतल्या एका शिक्षकानेच हा किळसवाणा प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. शाळेत रूबेला लसीकरण चालू असताना सातवी इयत्तेतील एका विद्यार्थिनीला बाजूच्या कक्षात नेऊन, तिच्या छातीला स्पर्श करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न त्या शिक्षकाने केला. या घटनेची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या घरी सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. उपलब्ध माहितीनुसार, आज (बुधवारी) सदर शाळेमध्ये रुबेला लसीकरणाचा उपक्रम सुरु होता. यावेळी आरोपी शिक्षकाने लसीकरण सुरु असलेल्या वर्गात जाऊन, पीडितेला बाजूच्या कक्षात येण्याची विनंती केली. सरांच्या सांगण्यानुसार पीडिता शेजारच्या वर्गात जाताच, आरोपीने तिच्या शरीराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली.


वाचा: गोवर, रुबेला लसीकरण : समज – गैरसमज 


हा प्रकार घडल्यानंतर पीडिता शिक्षकाच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि तिने रडत रडत आईजवळ जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे आई आणि वडील त्या शिक्षकाला जाब विचारण्याकरता जात असताना गावकऱ्यांनाही बातमी समजली. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थसुद्धा जिल्हा परिषद शाळेत पोहचले आणि सदर शिक्षकाला त्यांनी चांगलंच झोडपून काढलं. याप्रकरानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला शांत करून आरोपीला तातडीने  पोलीस स्टेशनमध्ये आणले. मुलीच्या आईच्या जबाबावरुन आरोपी शिक्षक संजय उत्तमराव पवार याला अटक करण्यात आली. या आधीसुद्धा एका अन्य विद्यार्थिनीसोबत त्याने असेच कृत्य केल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान समजली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर विनयभांगाचा गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -