घरमहाराष्ट्रशुभेच्छा स्विकारण्यासाठी पवार ४ तास उभे!

शुभेच्छा स्विकारण्यासाठी पवार ४ तास उभे!

Subscribe

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्यावतीने, शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव अर्थात शरद पवार यांचा आज ७८ वा वाढदिवस आहे. पवार साहेबांचे राज्यभरातील चाहते सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकंच नाही तर पवारांचे चाहते तसंच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारांची भेट घेण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले. दरम्यान, शरद पवारांनीही राज्यभरातून आलेल्या तमाम लोकांना तितक्याच उत्साहाने हसतच हस्तांदोलन केले. उपलब्ध माहितीनुसार, पवारांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये तब्बल ४ तास उभं राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या. पवारांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी सभागृहामध्ये अक्षरश: अलोट गर्दीचा महापूर पाहायला मिळाला.
आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्यावतीने, शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवारांनाही न थकता जवळजवळ चार तास उभे राहून शुभेच्छा स्वीकारल्या. 

‘चला देऊया मदतीचा हात’

राज्यात भीषण दुष्काळ असून त्यामध्ये बळीराजा होरपळत असल्याने पवार यांनी आपल्या वाढदिवशी पुष्पहार, पुष्पगुच्छ स्विकारुन, एखादा भव्य असा कार्यक्रम सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच कार्यक्रमांचा शक्य तो निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पक्षाच्यावतीने ‘चला देऊया मदतीचा हात’ ही संकल्पना अंमलात आणण्याचे आवाहन केले होते. या संकल्पनेनुसार, महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांकडजे दुष्काळग्रस्तांसाठीचा धनादेश सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार यांच्या आयुष्यातील घटनांचा वेध घेणारे प्रसंग फोटो प्रदर्शनातून मांडण्यात आले होते. यावेळी विशेष उपस्थिती ही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे माजी गृहमंत्री पी.जी.आर.सिंदिया यांची होती.

- Advertisement -

सुरुवातीला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी व नेते, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय राजपत्रित अधिकारी आणि एमसीएचे पदाधिकारी यांनीही पवार यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -