घरमहाराष्ट्रभोंदू बाबाने 'भक्ता'वरच केला बलात्कार

भोंदू बाबाने ‘भक्ता’वरच केला बलात्कार

Subscribe

मराठवाड्यामध्ये या असीफ नुरी या बाबाचा बोलबाला आहे. बुलडाणा, परभणी, नांदेड, औरंगाबाद या ठिकाणी या बाबाचे भक्त आहेत

देशभरात भोंदू बाबांचे पेव फुटले आहे. गेल्याच आठवड्यात हरयाणामधील बाबा अमरपुरी याला १२० महिला भक्तावर बलात्कार केला या प्रकरणी अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका बाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधील एका कथित बाबाने त्याच्या भक्तावर अनैसर्गिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. असीफ नुरी असे या बाबाचे नाव असून या बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मराठवाड्यामध्ये या असीफ नुरी या बाबाचा बोलबाला आहे. बुलडाणा, परभणी, नांदेड, औरंगाबाद या ठिकाणी या बाबाचे भक्त आहेत. या बाबाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हा बाबा एका पुरुष भक्तावर जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. शिवाय या बाबाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. या बाबाने आणखी काही पुरुषांसोबत असे काही केल्याचे आता पोलीस चौकशीअंती समोर आले आहे.

- Advertisement -
वाचा – भोंदू बाबाने केला १२० महिलांवर बलात्कार!

पूजेच्या बहाण्याने करायचा अत्यचार

असीफकडे भक्त आल्यानंतर तो त्यांना वेगळ्या रुममध्ये घेऊन जायचा. पूजाविधीत काही गोष्टी करायला लागते हे सांगून तो भक्तावर अनैसर्गिकपद्धतीने बलात्कार करायचा. यासोबतच बाबाचे अन्य सहयोगी यात सामील असायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आसाराम आणि बाबा राम रहिम अटकेत

आसाराम बापू आणि बाबा राम रहिम हे देखील बलात्कार प्रकरणामुळे अटकेत आहेत. या शिवाय दिवसागणिक आणखी काही भोंदू बाबांची नावे आणि त्यांचे प्रताप समोर येत आहेत. त्यामुळे अशा बाबांपासून सावधान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -