घरमहाराष्ट्रकात्रज घाटातील दरीत शिवशाही कोसळली; दोघांचा मृत्यू

कात्रज घाटातील दरीत शिवशाही कोसळली; दोघांचा मृत्यू

Subscribe

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळाली आहे.

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला कात्रज घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. शिंदेवाडी गाव येथे आज दुपारच्या सुमारास शिवशाही बस उलटल्याची माहिती मिळाली आहे. कात्रज घाटातील ५० फूट खोल दरीत शिवशाही कोसळून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळाली आहे. तसेच अपघातातील जखमी प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

अपघातग्रस्त शिवशाही बस ही पुण्याहून सांगलीच्या दिशेनं चालली होती. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -