छत्रपतीही मावळे घडवतात, संभाजीराजेंचे चिरंजीव शहाजीराजेंचे संजय राऊतांना उत्तर

Shahaji Raje Chhatrapati's reply to Sanjay Raut
छत्रपतीही मावळे घडवतात, संभाजीराजेंचे चिरंजीव शहाजीराजेंचे संजय राऊत यांना उत्तर

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मावळे असतात म्हणून राजे असतात, असे वक्तव्य केले होते. याला आपल्याला राजकारणातले काही कळत नाही. काल (बुधवार) प्रसार माध्यमात बातमी होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात. मात्र, मला सांगायचे आहे की, छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती (Shahaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले.

संभाजीराजेंनी शिवसेनेला केले होते पाठिंब्याचे आवाहन –

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले होते. त्यांनी शिवसेनेला विनंती केली होती. मात्र, शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका सेनेने घेतली. सेनेची भूमिका संभारीजेंना मान्य नसल्याने सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे वृत्त सुत्र सांगत आहेत. तत्पूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती (Shahaji Raje Chhatrapati) यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोलापुरात शहाजीराजेंचे सूचक विधान –

सोलापूर शहरातील सामाजिक संघटना संभाजी आरमारच्या 14 व्या वर्धापन दिनी शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी शहाजीराजे छत्रपती (Shahaji Raje Chhatrapati) हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर नेमक्या भाषणात सूचक आणि महत्वपूर्ण विधान केले.

संजय राऊतांनी केली होती टीका –

संभाजीराजेंना अपक्ष लढायचे असेल तर त्यांच्याकडे ४२ मतं असतील. आमच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुनच आम्ही त्यांना पुढील प्रस्ताव दिला. शेवटी मावळे असतात म्हणून राजे असतात, असे सूचक वक्तव्य संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले होते.