घरमहाराष्ट्रअजितदादा परवानगी द्या, त्या सोमय्याला बघूनच घेतो; शशिकांत शिंदे आक्रमक

अजितदादा परवानगी द्या, त्या सोमय्याला बघूनच घेतो; शशिकांत शिंदे आक्रमक

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे सुरु आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना म्हटलं परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी बघून घेतो. पण अजितदादांनी शांततेत घ्यायला सांगितलं म्हणून मी शांत आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

साताऱ्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शशिकांत शिंदे भाजप, सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर तुटून पडले. “सध्याच्या राजकारणात भाजपला, ईडीला आणि बाकीच्यांना कोण पळवून लावणारे असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -

ईडी, आयकरच्या बापाला घाबरत नाही

आपण परिणामांची चिंता करत नाही. ईडी, आणि आयकरच्या बापाला आपण घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शशिकांत म्हणाले.

त्यावेळी भाजपकडून १०० कोटींची ऑफर

शशिकांत शिंदे यांनी भाजपने दिलेल्या ऑफरसंदर्भात पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला मागे १०० कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटतं ते १०० कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पना आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -