जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते, शरद पवारांचे श्रीलंका पाकिस्तानच्या अराजकतेवर प्रतिक्रिया

Sharad Pawar slams bjp leader said People are smart teach a lesson politicians when they make a mistake
जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते, शरद पवारांचे श्रीलंका पाकिस्तानच्या अराजकतेवर प्रतिक्रिया

श्रीलंका पाकिस्तानमध्ये महागाईमुळे लोकं त्रस्त आहेत. लोक संतापलेल्या अवस्थेत रस्त्यावर उतरली आहे. परंतु भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले असल्यामुळे देश एकसंघ आहे. असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच भारतातसुद्धा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांचे सरकार पाडण्यात आले होते. देशातील जनता आता हुशार आहे. नेते चुकत असतील तर त्यांना धडा शिकवला जातो असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार पुरंदरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी शरद पवार यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अराजकतेवर भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, देशात आर्थिक संकट प्रचंड आहे. नोटबंदीच्या काळात फक्त अर्थव्यवस्था संकटात आली. त्यांनी अनेक अशा प्रकारचे निर्णय घेतले त्यामध्ये लोकांना सहभागी करायचे असते ते केले नाही. कोरोना काळात एक दिवशी सांगितले सगळ्यांनी थाळी वाजला लोकांनी थाळ्या वाजवल्या परंतु त्याचे उत्तर ते नव्हते अशा अनेक गोष्टी या कालखंडात दाखवल्या गेल्या आहेत असे शरद पवार म्हणाले आहेत.

बाबासाहेबांची घटना देशासाठी जमेची बाजू

भारताची जमेची बाजू ही आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेमुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत. त्या घटनेने देशाला एकसंघ ठेवले ही गोष्टी मान्य करावी लागेल. श्रीलंकेत पाहिले तर राज्य कर्त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे. लोकं रस्त्यावर आहेत. श्रीलंकेत जसे चित्र आहे तसे पाकिस्तानमध्ये आहे. एक महिन्यापूर्वी त्यांच्या पंतप्रधानांना काढण्यात आले आहे. अशा अनेक घटना आहेत. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होते त्यांची हत्या करण्यात आली आहे. संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जात असते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही याचे कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आहे.

देशातील जनता हुशार

दरम्यान शरद पवार पुढे म्हणाले की, दुसरी गोष्ट चांगली आहे. ती म्हणजे राजकारणी शांतपणे निकाल घेतो. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निर्णय घेतला. लोकशाहीवर संकट आले असे लोकांना वाटले त्यामुळे लोकांनी इंदिरा गांधींचे सरकार पाडलं. त्यावेळी मोरारजी यांच्या हातामध्ये राज्य दिले. परंतु दोन वर्षात त्यांना राज्य चालवता आलं नाही हे दिसले त्यामुळे ज्यांनी इंदिरा गांधी यांचे सरकार पाडलं त्यांच्याकडे पुन्हा राज्य दिले. याचे कारण या देशातील लोकं शहाणे आहेत चुकले तर अक्कल शिकवतात आणि त्याच्यातून दुसरं कोण पुढे आलं तर त्याला संधी देतात.


हेही वाचा : राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा