राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati declares i will independently contest Rajya Sabha elections

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तसेच आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा केली आहे. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असल्याची खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिले असेल तर येत्या जुलैमध्ये ६ जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचे समीकरण काय तर ३ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना आणि १ जागा काँग्रेस असे सहा जागांचे समीकरण आहे. परंतु आताचे समीकरण आहे की, २ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना सहाव्या जागेचं संख्याबळ कमी असल्यामुळे कुठलाही एक पक्ष आणि कुठलीही १ आघाडी करु शकत नाही असे संभाजीराजेंनी सांगितले आहे.

राज्यसभा निवडणूक लढवणार 

खासदारकी मिळवायची असेल तर महाविकास आघाडीकडे २७ मत आहेत आणि भाजपकडे २२ मत आहेत. तर माझा इथे भूमिका राहणार आहे. यावर्षीची राज्यसभा निवडणूक मी लढवणार आहे. परंतु कुठल्या पक्षात जाणार हा प्रश्न आहे. यावर्षीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. म्हणून माझी कार्यपद्धती पाहिली असेल तर राजकारण विरहीत समाजाला दिशा देण्यासाठी आहे. मी कधी पाहिले नाही याचा फायदा कोणाला होईल, नेहमी समाजाचे हित पाहिले आहे.

जनतेनं मला जाहीर पाठिंबा द्यावा 

माझा अधिकार बनतो की, आपण अपक्षा म्हणून मला पाठिंबा देण्याचे गरजेचे आहे. जे २९ आमदार आहेत. त्यात छोटे मोठे पक्ष आहेत. तुम्ही मोठे मन दाखवून माझ कार्य पाहून मला जाहीरपणे पाठिंबा द्यावा मला विश्वास आहे. एक व्यक्ती राजकारण विरहीत काम करु शकते तर आपण का नाही राज्यसभेवर पाठवू शकता असे संभाजीराजेंनी जनतेला आवाहन केलं आहे.

सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं

पक्षातील लोकं आहेत. मी जेव्हा पाठींबा दिला तेव्हा लोकहिताच्या मुद्द्यावर पाठींबा दिला आहे. काम करताना मी राजकीय फायदा पाहिला नाही. समाजासाठी शाहूंचा वंशज म्हणून बाहेर पडलो आहे. आज तुमची वेळ आली आहे. माझा कार्यकाळ संपला असल्यामुळे माझे योगदानाची दखल घेऊन राज्यसभेवर पाठवाव, आणि सर्व पक्षीय नेत्यांना माझी विनंती आहे आणि तुम्ही मला पाठवाल असा विश्वास आहे. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.


हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन