घरताज्या घडामोडीएल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी व्हावी - शरद पवार

एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांची चौकशी व्हावी – शरद पवार

Subscribe

एल्गार परीषद प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परीषदेत केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “लोकशाहीत तीव्रपणे भाषण करून मत मांडली जातात. एल्गार परीषदेत या प्रकारच्या तीव्र भावना मांडल्या गेल्या. या भावना मांडणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबून ठेवणे हा सत्तेचा गैरवापर आहे. अॅड. सुरेश ढवळे, महेश राऊत, वरावरा राव, सुधा भारद्वाज अश्या व्यक्तींना या गुन्ह्यात अटक करून त्यांना डांबून ठेवण्याचे हे पोलिसांचे कृत्य आक्षेपार्ह असून, मुलभुत स्वातंत्र्यावर हा घाला असुन, यासंपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे.” एखाद्याकडे नक्षलवादी पुस्तक सापडले, साहीत्य सापडले म्हणजे तो देशद्रोह होऊ शकत नाही. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

नागरीकत्व कायद्याला ( एनआरसी ) राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविलेला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांचा उल्लेख या कायद्यात आहे, श्रीलंका, नेपाळ या देशांचा उल्लेख का केला नाही असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हा विषय पुढे आणला गेल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. नागरिकांनी शांतता आणि संयम ठेवत, कायदा हातात न घेता विरोध केला पाहिजे असे आवाहन पवार यांनी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेच्या कालावधीत राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

पुण्यातील पत्रकार परीषदेत पवार यांनी  राज्य सरकारच्या खर्चासंदर्भात कॅगच्या अहवालाचा संदर्भ देत वरील आरोप केला. या अहवालानुसार ६६ हजार कोटी रुपयांचा हिशोब लागत नाही. याप्रकरणी जाणकारांची समिती तयार करून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप केला. पैशाचा हिशोब लागत नसल्याने याप्रकरणी चौकशी येण्याची गरज आहे. जाणकार व्यक्तींची समिती नियुक्त करून वस्तुस्थिती जनतेसमार मांडली गेली पाहीजे असेही पवार यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -