घरताज्या घडामोडीbreaking : नाणार प्रकल्पाला शरद पवारांचा पाठिंबा, राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

breaking : नाणार प्रकल्पाला शरद पवारांचा पाठिंबा, राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विषयाच्या निमित्ताने आपल्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्याचे स्पष्ट केले आहे. नाणार रिफायनरीच्या प्रकल्पबाधितांच्या शिष्टमंडळाला त्यांनी ही माहिती दिली आहे. खुद्द शरद पवारांनीही नाणार प्रकल्पाबाबतची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी शरद पवारांचाही नाणार प्रकल्पाला पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. याआधीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित नाणारचा प्रकल्प राज्यातून बाहेर जाता कामा नये अशी भूमिका पत्राद्वारे मांडली होती. त्यावर विऱोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेचे आज सोमवारी स्वागत केले. नाणार रिफायनरीच्या प्रकल्पावर शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे आता नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्येही बोलणे होणार असल्याचे कळते.

मुख्यमंत्री मला वेळ देत नाही, पवारांना नक्कीच देतील – राज ठाकरे 

राज ठाकरे म्हणून मला ठाकरे सरकार वेळ देत नाही. पण शरद पवारांना नक्कीच वेळ देतील. कारण महाविकास आघाडीचे सरकार पवारांवर अवलंबून असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. शरद पवारांचे प्रकल्पाच्या दृष्टीने पाऊल शिवसेनेला अडचणीचे ठरणार आहे. नाणार प्रकल्पबाधितांचे १४ गावातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आज सोमवारी राज ठाकरे यांना भेटले. नोकऱ्यांच्या दृष्टीने याठिकाणी प्रकल्प आला तर गावांचा आणि कोकणाचा विकास होईल अशी भूमिका शिष्टमंडळातील सदस्यांनी मांडली आहे. त्यामुळे आमचा प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कळते. शरद पवार यांच्या प्रकल्पाच्या समर्थनातील भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या भूमिकेचे फडणवीसांकडून स्वागत

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचं पत्र मिळाले मी त्यांच्या पत्राच स्वागत करतो,त्यांनी श्री अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा करून सर्व शंका दूर केल्या आणि कोकणच्या विकासासाठी नाणार येथेच रिफायनरी करणे हे कोकणच्या विकासाकरिता महत्वाचे आहे आणि त्याला फक्त पाठिंबाच नाही तर याबाबतीत ब्लुप्रिंट तयार करण्यास ते मदत करणार आहेत. आम्ही वारंवार हेच सांगत होतो की कोकण विकासाचा महत्वाचा टप्पा या नाणार रिफायनरी मूळे होणार आहे ,ही ग्रीन रिफायनरी आहे, आपण गुजरात मध्ये बघितले आहे की जेथे रिफायनरी आहे तेथे सर्वोत्तम आंबे होतात फळबागा होतात त्यामुळे प्रदूषणाच्या बद्दल ज्या काही शंकाकुशंका आहेत त्या चुकीच्या आहेत असे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस म्हणाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे, आर्थिक ऍक्टिव्हिटी वाढणार आहे,हजारो लोकांना थेट आणि लाखो लोकांना इंडायरेक्ट रोजगार याच्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतली ही आजपर्यंत च्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे,यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.आता उद्धवजी यांनी देखील काकोडकर यांच्यासारख्या तज्ज्ञांच्याकडून हे समजून घ्यावे आणि त्याला पाठिंबा द्यावा. याचा निवडणुकीशी संबंध लावण्याचं कारण नाही ही पूर्णपणे एका प्रोजेक्ट बद्दलची आमची भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत यांना जर त्यांचं मन मोकळे करण्याची संधी दिली तर त्या सर्वांच याला समर्थन मिळेल पण त्यांना उसनं अवसान आणून त्या ठिकाणी त्यांना याला विरोध करावा लागत आहे. मी जेव्हा यात्रेनिमित्त त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा दहा हजार एकराच्या लोकांनी याला समर्थन दर्शविले होते यापेक्षा पाठिंबा काय हवा, शिवसेनेनेही महाराष्ट्राच्या हितासाठी ही भूमिका घेऊन नाणार मध्ये प्रकल्प होऊ द्यावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -