घरताज्या घडामोडीInternational Women’s Day: राज्य सरकारने महिलांना दिली 'ही' खास भेट

International Women’s Day: राज्य सरकारने महिलांना दिली ‘ही’ खास भेट

Subscribe

आज जागतिक महिला दिन. २८ फेब्रुवारी १९०९ सालापासून जागतिक महिला साजरा केला जातो. हा दिवस सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीसाठी महिलांना समर्पित केला जातो. आज खास महिला दिनानिमित्ताने राज्यातील महिला खास गिफ्ट देण्यात आले आहे. सध्या कोरोना लस घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ५ ‘लेडीज स्पेशल’ कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी राज्यात महिला कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात एकूण १८९ महिला लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून यामधील सर्वाधिक १९ केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत. या लसीकरण केंद्रामध्ये फक्त महिलांच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात करोना लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला असून १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना आणि वय ४५ ते वय ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयामधील लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जात असून खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर २५० रुपयांत दिली जात आहे. ही लस घेण्यासाठी ‘को विन’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा असून थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.


हेही वाचा – ‘International Women’s Day’: ‘जागतिक महिला दिना’च्या खास शुभेच्छा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -