घरमहाराष्ट्रनाशिक'जगावं की मरावं' असा प्रश्न आमच्यासमोर; शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा

‘जगावं की मरावं’ असा प्रश्न आमच्यासमोर; शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा

Subscribe

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा पवारांना सांगत असताना शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या नावाने बोटं मोडत सरकारविषयी नाराजी व्यक्त केली

राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या शेतीच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. परतीच्या पावसामुळे राज्यभरात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्य़ा शेत पिकांचे नुकसान झाले. यानंतर नाशिक जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शरद पवार यांनी भेट दिली आहे. दरम्यान पवारांनी शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी करत शेतक-यांची आस्थेने चौकशीदेखील केली. यावेळी शरद पवार यांनी पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या.

- Advertisement -

भाजप सरकारच्या नावाने मोडली बोटं

नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पवारांनी भेट घेतली. इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांमधील शेतकऱ्यांनी पवारांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अगदी शेतामध्ये जाऊन पवारांनी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पिकांची पहाणी केली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि झालेल्या नुकसानाची माहिती पवारांना दिली. ‘आमच्या हाती आलेलं पीकं या पावसामुळे गेलयं. आमचं खूप नुकसान झालंय साहेब. जगावं की मरावं असा प्रश्न आहे,’ अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा पवारांना सांगत असताना शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या नावाने बोटं मोडत सरकारविषयी नाराजी व्यक्त केली.

शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी करत शेतक-यांची आस्थेने चौकशीदेखील केली. यावेळी शरद पवार यांनी पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -