घरमहाराष्ट्रLockDown: परदेशातील १० लोकं नेवासा मशिदीत लपून; अखेर पोलिसांच्या ताब्यात

LockDown: परदेशातील १० लोकं नेवासा मशिदीत लपून; अखेर पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

हा प्रकार उघड झाल्यानंतर नेवासा पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल

जगभरात कोरोनाची दहशत असताना या व्हायरसने अनेकांचे बळी घेतले. यावर खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटाचा विळखा लक्षात घेता सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून देखील पाऊलं उचलली आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना अनेक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना देखील वारंवार आवाहन केले जात आहे. अशाताच नेवासा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशातून आलेल्या १० लोकांना मशिदीमध्ये लपून ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे.

नेवासा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

नेवासा येथील मशिदीत गेल्या आठ दिवसांपासून परदेशातील १० जण लपून होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर नेवासा पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मरकस मस्जिदचे ट्रस्टी जुम्माखान पठाण , सलिम पठाण यांचा समावेश आहे. तसेच मशिदीत लपलेल्या परदेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

१० जणांची होणार कोरोना टेस्ट

ताब्यात घेण्यात आलेल्या जिबूती, बेनिन, डेकॉर्ट आणि घाना या देशातील दहा जणांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.


Coronavirus: …म्हणून जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -