घरमहाराष्ट्रअमित शहांच्या विधानानंतर शिवसेनेने केला 'हा' व्हिडिओ व्हायरल

अमित शहांच्या विधानानंतर शिवसेनेने केला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

Subscribe

आम्ही पण छातीवर गोळ्या झेलतो - संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना आणि भाजपमधील वचनाबाबत खुलासा केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात येईल असे वचन कधीही देण्यात आले नव्हते असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. रविवारी कोकणात मेडिकल कॉलेजच्या उद्घागटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या युती तुटल्याबाबत तसेच महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. महाविकास आघाडीने जनादेशाचा अपमान केला आहे. तसेच राज्यातील सरकार हे तीन चाकांच्या गाडीसारखे आहे. तीन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत. स्थिर सरकार नसल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह यांनी वचन दिले नसल्याचे वक्तव्य केले तसेच मी बंद दाराआड काही करत नाही डंक्याच्या टोकावर सार्वजनिकरीत्या करतो असे अमित शाह यांनी म्हटले. यावर शिवसेनेच्या पेजवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय. या व्हिडिओत फडणवीस आम्ही पद आणि जबाबदाऱ्या समान पद्धतीने सांभाळण्यात येतील असे म्हणत आहेत.

काय म्हणाले फडणवीस

पुन्हा निवडून आल्यास त्यावेळी पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. तसेच त्या दृष्टीने जे पद आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यास देण्यात येतील त्याही समान पद्धतीने सांभाळण्यात येतील हा निर्णय आम्ही केलेला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, आमच्याकडून या गोष्टी धरुन आहेत यापुढे काही शंका तयार झाली तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित भाई हे दोघे सक्षम आहेत. ते निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम राहणार आहे. त्यामुळे कुठलाही गोंधळ आमच्यात नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अमित शाह यांनी कोणतेही वचन दिले नसल्याचे विधान केल्यामुळे फडणवीसांचा हा व्हिडिओ शिवसेनेने अधिकृतरित्या व्हायरल केला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एख व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे १५ ते २० मिनिटे आतल्या खोलीत चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

अमित शाहांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनेने सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांताना तापी नदीत सोडले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमति शाह यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही जर शिवसेनेच्या मार्गावर चाललो असतो तर आता शिवसेनेचा आता नामोनिशाण उरले नसते असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. १९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात मला वाटत मुरली देवरा यांनी शिवसेने संपेल असे म्हटले होते. त्यानंतर २०१२ साली पृथ्वीराज चव्हाणही म्हणाले होते शिवसेना संपेल. परंतु दोन्ही वेळेला शिवसेना पुन्हा पूर्वीपेक्षा ताकदीनिशी पुढे आली आहे. जय महाराष्ट्र असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

आम्ही पण छातीवर गोळ्या झेलतो – संजय राऊत

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, देशाचे गृहमंत्री म्हणतायत की मी बंद खोलीआड बोलत नाही मी खुलेआम बोलतो तर शिवसेनाचीही समान भूमिका आहे. आम्ही पण छातीवर गोळ्या झेलतो पाठीत वार करत नाही. ही परंपरा आहे. हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले आहे की, विश्वास घात नाही करायचा, पाठीत खंचीर खुपसायचा नाही, खोटं बोलायचे नाही. त्यामुळे ज्या बंद खोलीचा उल्लेख गृहमंत्री अमित शाह करतायत ती आमच्यासाठी बंद खोली नाही. तर ती त्यांच्यासाठी बंद खोली असेल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -