संजय राऊतांच्या भेटीसाठी शिवसेनेचे आमदार- खासदार ऑर्थर रोड कारागृहात, पण…

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केली. यानंतर संजय राऊतांच्या भेटीसाठी शिवसेनेचे आमदार- खासदार ऑर्थर रोड कारागृहात गेले होते.

sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केली होती. त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे खासदार, आमदार  कारागृहात गेले होते. मात्र, त्यांना भेटीची परवानगी नाकारण्यात आली.

संजय राऊत यांना भेटण्यासाठी 1 खासदार आणि 2 आमदार गेले होते. मात्र, ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने त्यांना भेटीची परवानगी नाकारली. नियमानुसार कोर्टाच्या परवानगीशिवाय रक्तातील नातेवाईक सोडून इत कोणीही आरोपीला भेटू शखत नाही, असे तुरुंग प्रशासनाकडून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सांगण्यात आले.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना सोडून इतरांना भेटीसाठी परवानगी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले. सुनील राऊत यांनी तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांच्याकडे संजय राऊत यांना वायचळ यांच्या कार्यालयात भेटू द्यावे अशी विनंती केली.मात्र, सुनील राऊत यांची ही निनंती फेटाळण्यात आली. यावेळी इतर कैद्याप्रमाणे तुम्हाला कुटुंबीयांना कुटुंबातील सदस्यांना भेटला येईल, असे संजय राऊत यांना सांगण्यात आले.