घरताज्या घडामोडीआमदार रोहित पवारांनी 'हे' धंदे बंद करावेत, शिवसेना खासदाराचा इशारा

आमदार रोहित पवारांनी ‘हे’ धंदे बंद करावेत, शिवसेना खासदाराचा इशारा

Subscribe

मतदारसंघांच्या कामात रोहित पवार सहभागी करुन घेत नाहीत अशी तक्रार शिवसैनिकांची आहे. याबाबत शिवसैनिकांनी गजानन किर्तीकर यांच्याकडे तक्रार केली होती.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन घटक पक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेली अंतर्गत धुसपूस वारंवार बाहेर येत असते. सरकारमधील नेते एकमेकांवर टीका करत असतात. यावेळी शिवेसनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ते धंदे बंद करावेत असा इशारा किर्तीकर यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकार तयार करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार रोहित पवारांचे आजोबा आहेत. पवार कुटुंबाला राजकारणाची मोठी परंपरा आहे. याची जान रोहित पवारांनी ठेवावी असे गजानन किर्तीकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान गजानन किर्तीकर पुढे म्हणाले की, रोहित पवारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे धंदे बंद करावे, असा इशारा किर्तीकर यांनी दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नेहमीच टोलवा टोलवी होत असते. यातून महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल असल्याचे दिसून येते.

मतदारसंघांच्या कामात रोहित पवार सहभागी करुन घेत नाहीत अशी तक्रार शिवसैनिकांची आहे. याबाबत शिवसैनिकांनी गजानन किर्तीकर यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर शिवसैनिकांना कामांमध्ये सहभागी करुन घ्यावे अन्यथा शिवसैनिक बांधिल राहणार नाहीत असा इशारासुद्धा किर्तीकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पुढील 24 तासात जीवे मारु, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धमकी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -