पुढील 24 तासात जीवे मारु, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धमकी

रुपाली चाकणकर यांना धमकी देणारा अज्ञात व्यक्ती अहमदनगरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जीवे मारण्याची धमकी देण्यामगील कारण अद्याप समजू शकले नाही.

threat calls to state women's commission chairperson Rupali Chakankar Kill in next 24 hours
'पुढील 24 तासात जीवे मारु', राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये तिसऱ्यांदा त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या (State Women’s Commission) कार्यालयात फोन आला होता. तसेच पत्रही पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांना पुढील २४ तासात जीवे मारण्याची धमकी (death threats) देण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महाराष्ट्र दौरा करत असतात. महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांच्या प्रश्नांवरुन त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे अनेकांशी वैर निर्माण झाले असल्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करुन रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

रुपाली चाकणकर यांना धमकी देणारा अज्ञात व्यक्ती अहमदनगरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जीवे मारण्याची धमकी देण्यामगील कारण अद्याप समजू शकले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गेल्या अनेक दिवसांमध्ये महिलांसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा पार पाडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्य महिला उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

रुपाली चाकणकर यांचा नगरसेवक ते महिला प्रदेशाध्यक्ष असा प्रवास त्यांनी राजकारणामध्ये केला आहे. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विरोधकांनासुद्धा सडेतोड उत्तर दिलं आहे. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच परखड भूमिका मांडली आहे.


हेही वाचा : VIDEO आव्हाडांचा ताफा वाहतूक कोडींत अडकला अन् पोलिसांनी उचलला सर्वसामान्यावर हात