घरमहाराष्ट्रगोव्यात शिवसेना, राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब

गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब

Subscribe

काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या पॅटर्नला नकार

गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नाकारल्याने गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही युती करण्याची ऑफर आम्ही काँग्रेसला दिली होती. याबाबत चर्चाही झाली. परंतु त्यांच्याकडून होकार किंवा नकारही कळवण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून येथील निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. आम्ही सर्व ४० जागांवर निवडणूक लढणार नाही; पण महत्वाच्या जागांवर आम्ही नक्कीच उमदेवार उभे करणार आहोत. उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर काही दिवसांनंतर दुसरी यादीही जाहीर करण्यात येईल.

- Advertisement -

तर, आम्हाला काँग्रेससोबत युती हवी होती, परंतु काँग्रेसला इथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती. काँग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. तरीही राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, असा दावा राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -