घरमहाराष्ट्रशिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे शिवतीर्थ अर्थात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार दसरा मेळावा कोण घेणार यावर बरीच चर्चा रंगतेय. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार केला आहे. उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभ्रम कोणाचा नाही.. दसरा मेळावा शिवतीर्थावर शिवसेनेचाच होणार, संभ्रम निर्माण करणाऱ्यांना संभ्रम करु द्या.शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर येण्याची तयारी केली आहे. तांत्रिक मांत्रिक काही भाग असेल ते बघतील, पण दसरा मेळावा शिवतीर्थावरचं होणार असल्याचं उद्धव ठाकरेंची ठणकावून सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थावर दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यात शिंदे गट आणि शिवसेना दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती, पण अद्याप पोलिसांकडून कोणालाही परवानगी मिळाली नाही, तसेच गणेशोत्सवानंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचे पालिका आयुक्तांनी जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा केली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी आद उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसेना नेत्यांवरही टीकास्त्र डागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, उद्धव ठाकरेंची टीका

एकूणच संभाजी ब्रिगेडनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवसेना पक्षप्रवेशावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी संभाजी बिग्रेड शिवसेनेसोबत आली. आज संघ परिवारातील लोकं हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या परिवारात आले आहे. हिंगोलीतील मात्तबर लोकं शिवसेनेत प्रवेश करत आहे. हा पक्षप्रवेश रोज सुरु आहे. सत्ताधारी पक्षाकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. आज महाराष्ट्रात प्रथमचं वेगळं चित्र दिसत आहे की, गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहे. भाजपेने आम्ही हिंदूत्व सोडल्याची आवई उठवली होती, प्रयत्न केला होता. त्या आवईला छेद देणारी आजची आजची सगळी घटना आहे. अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उद्धव कदम म्हणाले की, मातोश्री हे हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंदिराचा गाभारा आहे. त्याचं महत्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल, पण आता आम्ही शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या शिवबंधनामध्ये काम करण्यासाठी आलो आहोत.


परळमधील महानगरच्या गॅसवाहिनीमधून वायूगळती, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -