घरमहाराष्ट्रनाशिककीर्तनातून शिवरायांचा संदेश : युवराज संभाजीराजे छत्रपती

कीर्तनातून शिवरायांचा संदेश : युवराज संभाजीराजे छत्रपती

Subscribe

नाशिक : देव, देश, धर्म वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले तेच कार्य आपण या कीर्तनरुपी कार्यक्रमातून पार पाडत आहात, असे उद्गार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले.

सातपूर भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी जे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या अन्याय अत्याचार व ढोंगी राजकारणा विरोधात जी चळवळ सुरू केली आहे त्यामध्ये वारकरी ,सर्व समाज प्रबोधनकार यांनी साथ सोबत मला मिळत असून सुराज्य करण्यासाठी हे सर्व प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले. हीच प्रेरणा आपण सर्वांनी घेऊन या ठिकाणीसुद्धा चांगल्या लोकांच्या पाठीशी राहणे काळाची गरज आहे. या ठिकाणी काही लोक माझ्या निदर्शनात आले आहेत की दबाव टाकतात मंदिरा पाडण्यासाठी प्रयत्न करतात चांगली विधायक कामे होत असतील तर त्याला अडचणी निर्माण करतात. अशा लोकांना आपण यापुढे आपल्या हातात असलेली मतदान रुपी ताकद दाखवून धडा शिकविला पाहिजे, असे आवाहनही राजेंनी केले. स्वराज संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर, तुषार जगताप, लक्ष्मण घाटोळ यांसह माजी नगरसेवक सदाशिव माळी, हेमलता कांडेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी सावता माळी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मंडळ सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, सविता गायकर प्रमोद जाधव, सुवर्णा मंडळ, गोविंद माळी, नवनाथ शिंदे, विष्णुपंत घुगे, वाळूबा थोरात, एकनाथ माळी, दिलीप महाले, राजेश महाजन, सावता सैंदाणे, दीपक चव्हाण उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -