घरमहाराष्ट्रसंतप्त शिवसैनिकांचा खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर धडक मोर्चा, घरात घुसण्याचा केला प्रयत्न

संतप्त शिवसैनिकांचा खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर धडक मोर्चा, घरात घुसण्याचा केला प्रयत्न

Subscribe

शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंसह 41 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. शिवसेना आमदारांसह खासदारही शिंदे गटात सहभागी होत असल्याने कट्टर शिवसैनिक कमालीचे नाराज झाले आहे. यात आज कोल्हापूर येथे शिवसैनिकांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. यावेळी धैर्यशील मानेंच्याविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी काही आक्रमक शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्रप पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने कोल्हापूरची शिवसेना धैर्यशील माने यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी मार्केट यार्ड येथे मोर्चाला सुरवात झाली. मार्केट यार्ड ते खासदार धैर्यशील माने यांचे निवासस्थान असणाऱ्या रुईकर कॉलनी असा हा मोर्चा पदक्रांत झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी आणि परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -

यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले याचबरोबर धैर्यशील माने यांना मोठी आर्थिक अडचण होती ती दूर करण्यासाठी 200 कोटींचे पॅकेज घेईन त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे, असा आरोप केला. यावेळी संजय पवार, रविकांत इंगवले, यांची भाषणे झाली. भाषणानंतर काही आक्रमक शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


ITR भरणाऱ्यांना यंदा मिळणार 2.5 लाखांपर्यंत अतिरिक्त सूट; 5 लाखांनंतर सुरू होणार टॅक्स कॅल्क्युलेशन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -