घरमहाराष्ट्रपुण्यात तळेगाव चौकात शिवसेनेचा राडा, ७ रिक्षा फोडल्या

पुण्यात तळेगाव चौकात शिवसेनेचा राडा, ७ रिक्षा फोडल्या

Subscribe

पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे आणि काही नगरसेवकांनी बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ रिक्षांची तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्यासह ११ जणांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे नाशिक महामार्गावर शहराच्या जवळ अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा उभ्या राहात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना अनेकदा करावा लागतो विशेषत: तळेगाव चौकात तर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे याच मुद्द्यावर स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचाच परिणाम रविवारी रात्री ८च्या सुमारास दिसून आला. आणि चक्क शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे हेच कार्यकर्त्यांसोबत या रिक्षांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरले.

नक्की झालं काय?

रविवारी रात्री ८च्या सुमारास तळेगाव चौकात आमदार सुरेश गोरे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. प्रारंभी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनांना दिशा दाखवण्याचा त्यांचा होरा होता. नंतर मात्र राग अनावर झाल्यावर त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षांवर दमदाटी करायला सुरुवात केली. यातून झालेल्या बाचाबाचीनंतर गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रिक्षांची तोडफोड करायला सुरुवात केली. या सगळ्यांनी मिळून तिथे उभ्या असलेल्या एकूण ७ रिक्षा फोडल्या.

कुणालाही मारहाण करण्यात आलेली नसताना मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल होऊ शकत नाहीत. अवैध प्रवासी वाहतुकीत पोलिसांचे हात बरबटलेले असल्याने खोटे तक्रारदार पुढे करून अवैध वाहतुकीचा गोरख धंदा चालविण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेणार नाही.

सुरेश गोरे, शिवसेना आमदार, खेड

- Advertisement -

अवैध प्रवासी वाहतुकीवर तोडफोडीचा उपाय?

या रिक्षावाल्यांकडून परिसरात केली जाणारी प्रवासी वाहतूक अवैध असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, यासंदर्भात अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या असल्याचं समजतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फेसबुकवरून आवाहन करून ५०० तरुणांनी रस्त्यावर उतरत श्रमदान केले होते. सुरेश गोरेंनी मात्र थेट तोडफोडीवर उतरत आक्रमक मार्ग निवडल्यामुळे परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – शिवसेना फोन टॅपिंग प्रकरण: ‘माय महानगर’चा दणका!

- Advertisement -

११ जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर आमदार सुरेश गोरेंसह ११ जणांवर पोलिसांनी २७ ऑगस्टला चाकण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या ११ जणांमध्ये आमदार सुरेश गोरेंच्या भावाचाही समावेश आहे. त्याचसोबत काही नगरसेवकही असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आमदार सुरेश गोरे यांच्याकडून या परिसरात बेकायदा रिक्षा चालवणाऱ्या चालकांना दमबाजी करणारी पोस्टरबाजी केली जात आहेत.

Shivsena MLA Suresh Khode
शिवसेनेचे पुण्यातल्या खेडचे आमदार सुरेश गोरे

तुम्ही हे पाहिलंत का? – गणेशोत्सवाच्या वादात शिवसेना आणि मनसेची उडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -