घरमुंबईशिवसेना फोन टॅपिंग प्रकरण: 'माय महानगर'चा दणका!

शिवसेना फोन टॅपिंग प्रकरण: ‘माय महानगर’चा दणका!

Subscribe

मध्यंतरी मुलुंड येथे झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाने शिवसेना पक्ष बदनाम झाला होता. या फोन टॅपिंग प्रकरणी माय महानगरच्या पाठपुराव्यानंतर विभाग प्रमुख दता दळवी यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला आहे. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता मुलुंड-भांडुप-विक्रोळी येथे विभाग प्रमुख म्हणून रमेश कोरगावकर यांची नियुक्ती केली आहे. पद नियुक्तीनंतर कोरगावकर आता मुलुंड विभागातील कार्यकारणी बरखास्त करून, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नवीन कार्यकारणीची निवड जाहीर करतील अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे.

काय होते फोन टॅपिंग प्रकरण?

माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी, मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणामुळे शिवसेनेतील पदं आणि उमेदवारीच्या तिकिटांची खरेदी विक्री होत असल्याची पोलखोल झाली होती. त्यानंतर तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, उपविभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली होती. मुलुंड विधानसभेतील उपविभागप्रमुख (शाखा क्रमांक १०७, १०८) जगदीश शेट्टी व शाखाप्रमुख दीपक सावंत (शाखा क्रमांक १०५) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आदेश देण्यात आले होते. तर आता दुसरीकडे
माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांची या फोन टॅपप्रकरणी चौकशी करत, उद्धव ठाकरे यांनी त्यांना विभागप्रमुख पदावरुन हटवले आहे आणि त्याजागी नगरसेवक रमेश कोरगावकर यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेना नगरसेवक रमेश कोरगावकर हे चार टर्म भांडुप इथून निवडून आले आहेत. कोरगावकर हे मुबंई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -