घरताज्या घडामोडीTipu Sultan Controversy:..तर आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा लागेल, टिपू सुलतान वादात संजय...

Tipu Sultan Controversy:..तर आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा लागेल, टिपू सुलतान वादात संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

'आम्ही टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगम पटण्णम, म्हैसुर राज्य या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. टिपू सुलतानाने काय केलं?, कसे अत्याचार केला?, काय अन्याय केला? किंवा ब्रिटांशासोबत कसा लढा दिला? हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

मुंबईतील मालाडमधील एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाचं वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल,. जर भाजपची ही भाषा असेल ते आम्ही बघू. टिपू सुलतानचं काय करायचं हे सरकार पाहिलं. कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलातानाचा रामनाथ कोविंद यांनी गौरव केला. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक अशा उपाध्या राष्ट्रपती दिल्या. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रपतींचा राजीनामा मागणार का? हा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही

‘पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. जर भाजपची ही भाषा असेल ते आम्ही बघू. टिपू सुलतानचं काय करायचं हे सरकार पाहिलं. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही आहात. तुम्ही इतिहास कशाप्रकारे नव्याने लिहिताय, बदलताय. अगदी दिल्लीमध्ये स्वतः इतिहास नव्याने कशा प्रकारे लिहायला घेतलाय, हे आम्हाला माहित आहे,’ असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही

पुढे राऊत म्हणाले की, ‘आम्ही टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगम पटण्णम, म्हैसुर राज्य या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. टिपू सुलतानाने काय केलं?, कसे अत्याचार केला?, काय अन्याय केला? किंवा ब्रिटांशासोबत कसा लढा दिला? हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही. पण महाराष्ट्रभर आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू, ही जर भाषा तुमच्या तोंडात असेल, तर या पेटाव, पेटवीमधले तज्ज्ञ महाराष्ट्रात कोण आहेत, हे सगळ्यांना माहित आहेत. पण आम्ही करत नाही. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिल्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का?’

उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन तुम्ही काय इथे गडबड करू नका

‘सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंद यांनी महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक या उपाध्या लावल्या आहेत. मग त्यांचा राजीनामा आधी मागवा. मुंबईत काय करायचं, त्यासाठी महानगरपालिका, सरकार आम्ही सगळे समर्थ आहोत. तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन तुम्ही काय इथे गडबड करू नका,’ असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा- Tipu sultan: जोरदार विरोधातच मालाडच्या मैदानाचे टिपू सुलतान नामकरण, राजकारण तापले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -