घरमहाराष्ट्रकोल्हापूरात शिवशाही बसला अपघात; वाहकाचा मृत्यू तर १६ प्रवासी जखमी

कोल्हापूरात शिवशाही बसला अपघात; वाहकाचा मृत्यू तर १६ प्रवासी जखमी

Subscribe

शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच आहे. कोल्हापूरात शिवशाहीबसला अपघात झाला असून या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर १६ जण जखमी झाले आहेत.

शिवशाही बस अपघाताचे सत्र सुरूच आहे. कोल्हापूरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिवशाही बसला अपघात झाला. पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर १६ प्रवासी जखमी झाले आहेत. शिवशाही बस पुण्याच्या निगडीहून सावंतवाडीला जात होती. शिवशाही बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.

सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु

हा अपघात ऐवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चालक आणि वाहकाच्या केबिनचा चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये बसचा वाहक जागीच ठार झाला तर चालकासह १६ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर येण्याचा मार्ग नसल्याने शेवटी बसच्या काचा फोडून इतर प्रवासी आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -

शिवशाहीचा प्रवास असुरक्षित

गेल्या वर्षभरात शिवशाही बसच्या अपघात सत्र वाढलेले असून २३० पेक्षा अधिक अपघात झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामध्ये १९ प्राणांतिक अपघात असून १९० हे गंभीर अपघात, तर २१ किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणे प्रवाशांना असुरक्षित वाटू लागले आहे.

अशा घडल्या अपघाताच्या घटना

जूनला अलिबागमध्ये शिवशाही आणि एसटी बसला अपघात झाला होता. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले होते. तर बसचे दोन्ही चालक गंभीर जखमी झाले होते. नाशिक- औरंगाबाद महामार्गावर शिवनेरी बस आणि पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरची धडक झाली. यामध्ये १५ प्रवासी जखमी झाले होते. १८ जूनला पुणे बेंगळुरु महामार्गावर कणेरी येथे चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बसला अपघात झाला. अपघातात चालकासह १३ प्रवाशी जखमी झाले होते. १ मे रोजी लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई-केज रोडवरील होळ जवळ उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले. १६ एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे ‘शिवशाही’ बसला अपघात झाला यामध्ये १० प्रवासी गंभीर जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -