घरमहाराष्ट्रनाशिकधक्कादायक : मृतदेहांची अदलाबदल; नाशिकचा मृतदेह थेट मध्यप्रदेशात

धक्कादायक : मृतदेहांची अदलाबदल; नाशिकचा मृतदेह थेट मध्यप्रदेशात

Subscribe

अंत्यसंस्काराच्या काही क्षणआधी हा प्रकार लक्षात आल्याने पुन्हा केली अदलाबदल

जिल्हा रूग्णालयात दोन मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेश आणि नवीन नाशिकमधील मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, मृतदेह रूग्णवाहिकेत ठेवून असताना त्यांची अदलाबदल झाली. अंत्यसंस्काराच्या काही क्षणआधी हा प्रकार लक्षात आल्याने नातेवाईकांनी एकमेकांशी संपर्क साधत शनिवारी (दि.२९) रात्री उशिरा चांदवड टोलनाक्यावर मृतदेहांची पुन्हा अदलाबदल करून घेतली.

व्दारका येथील पण मूळचे मध्यप्रदेश शहडोल येथील ६५ वर्षीय पुरुषाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) त्यांच्या मृतदेहाचे नाशिक जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, नवीन नाशिकमधील वयोवृद्ध पुरुषाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्याही मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह समवयीन होते. मध्यप्रदेश येथील व्यक्तीचे शवविच्छेदन होऊन शनिवारी दुपारी दीड वाजता सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला होता. खासगी रूग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने मृतदेह शवगृहाबाहेर स्ट्रेचरवर ठेवण्यात आला होता. नवीन नाशिक येथील दुसर्‍या व्यक्तीचे शवविच्छेदन पूर्ण करून वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतदेह शनिवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह शवगृहाबाहेरील स्ट्रेचवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी मृताचे नातेवाईक कायदेशीर पूर्तता करत होते.

- Advertisement -

मध्यप्रदेशला मृतदेह नेण्यासाठी उशीर होत असल्याने मृताचे नातेवाईक धावपळ करत होते. दरम्यान, नातेवाईकांनी नजरचुकीने नवीन नाशिकमधील वयोवृद्धाचा मृतदेह मध्यप्रदेशला जाणार्‍या रूग्णवाहिकेत ठेवत ते मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाले. ही बाब घटनास्थळी दुसरा रूग्णवाहिकाचालक आला असता त्याच्या लक्षात आली. चालकाने तत्काळ नातेवाईकांशी संपर्क साधत मृतदेहांची आदलाबदली झाल्याने सांगितले. तोपर्यंत मध्यप्रदेशकडे मृतदेह घेऊन जाणारे नातेवाईक धुळ्याजवळ पोहोचले होते. नाशिकमधील नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते तेथून पुन्हा माघरी फिरले. दुसरा रूग्णवाहिकाचालक त्यांचा मृतदेह घेऊन धुळ्याकडे निघला. त्यांची भेट चांदवड टोलनाका परिसरात झाली. शनिवारी रात्री उशिरा पुन्हा मृतदेहांची आदलाबदली करून उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणपत्र व मृतदेह पोलीस व नातेवाईकांकडे ओळख पटवूनच दिले जातात. दोन्ही मृतदेहाची ओळख पटवून पोलिस व नातेवाईकांकडे देण्यात आले होते. मृतदेहांची नातेवाईकांमुळे अदलाबदली झाली. त्यांना ती मान्य आहे. यात जिल्हा रुग्णालयाचा काहीही एक संबंध नाही.
– डॉ. आनंद पवार, शवविच्छेदन तज्ज्ञ

- Advertisement -

मृतदेह नातेवाईकांच्या चुकीमुळे दुसर्‍याच रूग्णवाहिकेत ठेवण्यात आले. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीच संपर्क करुन मृतदेह पुन्हा अदलाबदली करून घेतले. तशी कबुली नातेवाईक व रूग्णवाहिकाचालकांनी दिली आहे. यामध्ये जिल्हा रूग्णालय प्रशासनाची चूक नाही.
– डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -