घरताज्या घडामोडीकरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थान देणार ५१ कोटीची मदत

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थान देणार ५१ कोटीची मदत

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थाने मदतीचा हात पुढे केला असून ५१ कोटीची मदत करण्यात आली आहे.

करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शिर्डीच्या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले असले तरी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शिर्डीच्या साई संस्थानने ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानच्या समितीने घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. संस्थानने यापूर्वीदेखील राष्ट्रीय आणि नैसर्गिक आपत्तीत वेळोवेळी मदत केली आहे. केरळमधील पुरातील पुरग्रस्तांसाठी पाच कोटी, राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ कोटी, पुलवामा येथील हल्ल्यातील शहिद जवानांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला असून आता करोनाच्या पार्श्वभूमीवर देखील संस्थानने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात साई प्रसादालयाच्यावतीने साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, मुकबधीर विद्यालये, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी, शिर्डी बसस्थानकातील निराधार आणि गरजू, संस्थान आणि शासकीय कार्यालयातील संरक्षण, स्वच्छता आणि इतर कामे करणाऱ्यांना निशुल्क भोजन पुरविले जात आहे. याशिवाय खेडोपाडी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपहारासाठी शुक्रवारपासून ३ हजार बुंदी आणि ३ हजार चिवड्याची पाकिटे पोलीस मुख्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली आहेत.


हेही वाचा – करोना पॉझिटीव्ह ट्रॅव्हल ऑपरेटर १५ गाव फिरला, २३ जण पॉझिटीव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -