घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग आला तिसर्‍या टप्प्यात,कोरोनाचा प्रभाव कमी झाला!

सिंधुदुर्ग आला तिसर्‍या टप्प्यात,कोरोनाचा प्रभाव कमी झाला!

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने जिल्ह्याला आता तिसर्‍या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सिंधुदुर्गात १९ जुलैपासून तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे जिल्हा चौथ्या टप्प्यात होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै २०२१ ते ८ जुलै २०२१ या आठवड्यातील कोविडबाधित रुग्णांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) १०.७ टक्के असून ९ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ या आठवड्यातील सरासरी पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) हा ७.४२ टक्के इतका आहे. पॉझिटिव्हीटी रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ९.६ असून सद्दस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा स्तर ३ मध्ये समाविष्ट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात २७ जुलै २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत स्तर ३ चे निर्बंध लागू असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यानी दिले आहेत.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणार्‍या आस्थापना सुद्धा १०० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -