घरताज्या घडामोडीSitaram Kunte : अनिल देशमुखांकडून आलेली पोलीस बदल्यांची यादी नाकारता येत नव्हती,...

Sitaram Kunte : अनिल देशमुखांकडून आलेली पोलीस बदल्यांची यादी नाकारता येत नव्हती, सिताराम कुंटेंचा ED समोर जबाब

Subscribe

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिलेल्या जबाबमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधीच म्हणजे ७ डिसेंबर रोजी नोंदवलेल्या जबाबामुळे राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार तसेच पोलिस बदल्यांमध्ये झालेल्या अपप्रकारांच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी संचलनालय (ED) तपास करत आहे. या तपासाअंतर्गतच ईडीला सीताराम कुंटे यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या माणसांकडून पोलीस बदल्यांची यादी पाठवायचे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामध्ये स्वीय सहाय्यक असलेले संजीव पलांडे आणि त्यांच्या माणसाकडून या चिठ्ठ्या यायच्या असेही त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांच्या बाबती होणारी गैरसोयही सीताराम कुंटे यांनी बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

त्यावेळी राज्याचे गृहमंत्री असेल्या अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने त्यांच्याकडून आलेली यादी नाकारता येत नव्हती, असाही जबाब दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या माणसांकडून यादी पाठवायचे. त्यामुळे ती यादी नाकारता येत नव्हती. त्यामधील काही नावे ही अंतिम यादीत असायची, असेही सिताराम कुंटे यांनी आपल्या जबाबदात म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. या खंडणी प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -