घरमहाराष्ट्रST Workers : माझ्या घरावर मोठा हल्ला झालाय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रिया...

ST Workers : माझ्या घरावर मोठा हल्ला झालाय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंनी जोडले हात

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी मोर्चा काढत चपला भिरकावल्या. या आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे घराबाहेर आल्या होत्या, दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर सुप्रिया सुळे यांनी बोलताना हा माझ्या घरावर मोठा हल्ला झाला आहे. आंदोलकांनी माझ्याशी येऊन बोलावं, त्यांनी अशाप्रकारे माझ्या घरावर हल्ला करण्याची गरज नव्हती. मी पोलिसांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंनी मानले पोलिसांचे आभार

“माझी अतिशय विनम्रपणे मुंबी पोलिसांचे अतिशय आभार मानते. मुंबई पोलिसांनी तातडीने येऊन माझ्या आई वडील आणि मुलांसाठी जे केलं त्यासाठी मनापासून आभार मानते. जी काही घटना झाली, ती दुर्दैवी झाली. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत मी तर पहिल्यांदा पाहिली आहे. पण हरकत नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, चर्चा करायला आम्ही सगळे तयार आहोत. इतर गोष्टींवर मला बोलायचं नाही. पण माझ्या घरावर मोठा हल्ला झाला आहे. मी मुंबई पोलिसांचे जाहीरपूर्वक आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचे पवारांवर आरोप

एसटी महामंडळाचं शोषण फक्त आणि फक्त शरद पवार यांच्यामुळेच होत आहे. शरद पवारच आमच्या शोषणाला जबाबदार आहेत. आमच्या १२५ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याला चोरांचे पुढारी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेले शरद पवारच याला जबाबदार आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्या घरावर चप्पला भिरकावल्या आहेत, असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, येत्या १२ एप्रिलला आम्ही बारामतीला धडकणार आहोत. पवारांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन करणार आहोत, हिंमत असेल तर आम्हाला रोखूनच दाखवा, असा इशारा या एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


हेही वाचा – ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर चप्पल भिरकावल्या, १२ एप्रिलला बारामतीत धडकणार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -