घरमहाराष्ट्रकोल्हापूर दसरा मेळाव्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

कोल्हापूर दसरा मेळाव्याला राज्य महोत्सवाचा दर्जा, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Subscribe

मुंबई – कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात आता शासकीय सहभाग असणार आहे. त्यासाठी  शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या, बुधवारच्या मेळाव्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली.

हेही वाचा – कोल्हापूरचा शाही दसऱ्याला शासकीय सहभाग, २५ लाखांचा निधीही मिळणार

- Advertisement -

कोल्हापूर दसरा मेळाव्याला पुढील वर्षी १ कोटी रूपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या माध्यमातून कोल्हापूरला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध  आहे. मात्र त्याची स्थानिक पातळीवरच जास्त माहिती आहे. कोल्हापूरची संस्कृती समृद्ध आहे. शाहू महाराजांचा मोठा वारसा आहे. त्याचसोबत देवी महालक्ष्मीचे देऊळ, कुस्ती, मैदानी खेळ, कोल्हापूरची खाद्य संस्कृती आदी बाबी देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आहेत, असे  केसरकर म्हणाले.

कोल्हापूरसोबतच सातारा येथेही गादी आहे. साताऱ्याला देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरा आजही पाळल्या जातात, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करून सातारा येथेही अशाच प्रकारे उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -