घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची राजीव गांधी सायन्स सिटी, काय आहेत वैशिष्ट्ये ?

विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची राजीव गांधी सायन्स सिटी, काय आहेत वैशिष्ट्ये ?

Subscribe

राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जागतिक दर्जाची विज्ञान नगरी उभारणे हे आमचे ध्येय आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी १९१ कोटी रुपयांची तरतूद केली करण्यात आली आहे. परंतु अधिक निधीची उपलब्धता असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी दिल्यामुळे राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे तर उर्वरित ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

राजीव गांधी सायन्स सिटी वैशिष्ट्ये

– एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे,
– परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे,
– अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे,
– तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे,
– आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे,
– अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण,
– प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : State Cabinet Meeting : वातावरण बदल, शाळा बांधकामांबाबत राज्य सरकारचे ३ महत्त्वाचे निर्णय


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -