‘शिवसेना आता आघाडीमध्ये आली…’, अजित पवारांचे पोटनिवडणुकीबाबत स्पष्टीकरण

पुण्यातील कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात हजेली लावली. एका बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे, तर दुपारनंतर पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांशी बैठक होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar

‘शिवसेना आता आघाडीमध्ये आली आहे. त्यानंतर आघाडीची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आले आहेत. त्या पक्षांना आपली मत मांडण्याचा अधिकार असतो’, असे सांगत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पोटनिवडणूक लढवण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी पत्रकांशी संवाद साधताना पोटनिवडणूक लढवण्याबाबत स्पष्टीकरण दिले. (State Leader of Opposition Ajit Pawar explanation about contesting by-elections kasba and chinchwad)

पुण्यातील कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे, तर दुपारनंतर पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांशी बैठक होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शिवाय, “कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आघाडीतून कुठल्या जागा? कोणी लढवायच्या? हे काल संध्याकाळपर्यंत अंतिम झालेले नाही. मात्र, आघाडीत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो, सर्वांनाचा मान्य करावा लागणार आहे”, असेही अजित पवार यांनी सांगितले.

“सुरूवातीला केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. तेव्हा शिवसेना आघाडीमध्ये नव्हती. शिवसेना आता आघाडीमध्ये आली आहे. त्यानंतर आघाडीची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आले आहेत. त्या पक्षांना आपली मत मांडण्याचा अधिकार असतो. परंतु, शेवटी वरिष्ठ पातळीवर सर्वांचेच नेते एक निर्णय घेतील, तोच निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे”, असेही त्यांनी सांगितले.

“मागील काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांची समजूत काढली होती. वास्तविक, राजकारणात काही जण सत्ताधारी कर काही जण विरोध पक्षात असताता, त्यामुळे राजकीय द्वेषातून कधी अशाप्रकारे त्रास कोणीच देऊ नये”,असेही अजित पवार यांनी सांगितले.

“मागील अडीच वर्षात आमचे सरकार होते. त्यावेळी सध्या सत्तेवर असलेल्या काही नेत्यांना आम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात आले. त्यावेळी काही अधिकाऱ्यांची नावे सांगण्यात आली किंवा त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली, असे सांगण्यात आले. त्यावेळेलाही मी सांगितले होते की, मी गेल्या 30 ते 32 वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीच सत्ता असताना त्या सत्तेचा गैरवापर करून कोणाला जाणीवपूर्वक अडचणीच आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. माझी आजही तीच भूमिका असून कायदा, नियम आणि संविधान सर्वांनाचा सारखे आहे”, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – निवडणुकीच्या तिकिटाचे आमिष दाखवून दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाची फसवणूक