घरमहाराष्ट्रCoronavirus - गर्दी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची गरज- राजेश टोपे

Coronavirus – गर्दी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची गरज- राजेश टोपे

Subscribe

महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्हचा आकडा आणखी वाढला असून एका रात्रीत एकूण ११ जण पॉझिटिव्ह आढळल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. यात मुंबईचे एकूण १० जण असून १ जण पुण्यातील आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील आकडा ५२ वरुन थेट ६३ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत.

मुंबई- पुण्यात इतर शहरांमधून आणि राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लोकं कामाला येतात. मुंबई- पुण्यात करोनाचा धोका वाढल्यामुळे करोनामुळे आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत.
परिणामी लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी रेल्वे स्थानकावर रात्रीपर्यंत गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीमुळे कोरानाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवायचा असल्यास, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी अधिक रेल्वे गाड्या देण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले. त्याचप्रमाणे लवकरात लवकर लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवण्यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी फक्त तीन जणांना संसर्गातून व्हायरसची लागण झाली आहे. शिवाय, ६३ पैकी १३ ते १४ जणांना संसर्गातून हा आजार झालेला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात संसर्गातून व्हायरसचे प्रादूर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. लोकांनी कमीत कमी बाहेर पडणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त पाळणे आता खूप महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बातचित केली असता त्यांनीही लोकल ट्रेन बंद करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, जर गरज भासली तर नक्कीच जनतेच्या हितासाठी लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.

लवकरच मेडिकल महाविद्यालयातही चाचणी सुरू करण्यात येईल

सध्या लोक गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे, पुण्यासारख्या ठिकाणावरुन जास्तीच्या रेल्वे देण्याचा प्रयत्न असणार आहे. शिवाय, तपासणी किट्स ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जर आकडा अशारितीने वाढला तर तपासणी करण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. परवानगी मिळाली तर लवकरच मेडिकल महाविद्यालयातही चाचणी सुरू करण्यात येईल. महाराष्ट्र अजून आपण दुसऱ्या टप्प्यात आहे. भारतात हा व्हायरस नव्हताच. बाहेरुन आलेल्यांमुळे हा व्हायरस भारतात आणि महाराष्ट्र, मुंबईत येत आहे. शिवाय, हा आकडा परदेशातून आलेल्या लोकांपासून वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -