घरताज्या घडामोडीCoronavirus: लवकरच मेडिकल महाविद्यालयातही होणार करोना चाचणी

Coronavirus: लवकरच मेडिकल महाविद्यालयातही होणार करोना चाचणी

Subscribe

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल एका रात्रीत राज्यात एकूण ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मुंबईत १० तर पुण्यात १ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ११ नव्या रुग्णांपैकी ८ रुग्ण हे विदेशातून आलेले आहेत. तर बाकीच्या तिघांचा संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ६३वर पोहोचली आहे. राज्यातील आकडा अशाप्रकारे वाढला तर तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरज भासेल. त्यामुळे केंद्राची परवानगी मिळाली तर लवकरच मेडिकल महाविद्यालयातही करोना चाचणी सुरू करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात करोनाची चाचणी कस्तुरबा हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल आणि बी.जे. मेडिकल महाविद्यायात केली जात आहे. तसंच हाफकिनच्या संचालकांशी चर्चा झाली असून लवकरच तिथे देखील दोन लॅब सुरू करणार असल्याचं टोपे यांनी एनआयव्ही भेट दिल्यानंतर सांगितलं होत.

- Advertisement -

लोकल ट्रेन बंद करण्याची गरज – केंद्रीय आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात संसर्गातून व्हायरसचे प्रादूर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. लोकांनी कमीत कमी बाहेर पडणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त पाळणे आता खूप महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बातचित केली असता त्यांनीही लोकल ट्रेन बंद करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, जर गरज भासली तर नक्कीच जनतेच्या हितासाठी लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.

जगात करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ७८ हजार ५०७वर पोहोचली आहे. यापैकी ११ हजार ५२४ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यापैकी ९१, ०९६ करोनाग्रस्त रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: राज्यात ११ आणखी करोना पॉझिटिव्ह रुग्ण, आकडा ६३ वर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -