घरमहाराष्ट्रस्टिंगचे जळगाव कनेक्शन; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा पलटवार

स्टिंगचे जळगाव कनेक्शन; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा पलटवार

Subscribe

प्रवीण चव्हाण यांनी फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावत या व्हिडिओमागे जळगाव कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून त्या क्लिपची खरी सत्यता उघड होण्याची आवश्यकता आहे.

भाजप आमदार गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. आता त्याच प्रकरणात फडणवीसांनी आरोप केलेल्या विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मोठा खुलासा केला आहे. फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडिओमागे जळगाव कनेक्शन असल्याचे म्हटले आहे.

प्रवीण चव्हाण यांनी फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावत या व्हिडिओमागे जळगाव कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून त्या क्लिपची खरी सत्यता उघड होण्याची आवश्यकता आहे. जळगावचा तेजस मोरे नावाचा मुलगा माझ्याकडे आला होता. त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले होते. स्टिंगमधून जळगाव कनेक्शन असल्याचे पहायला मिळत आहे. माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करण्यात आले असून व्हिडिओ आणि ऑडिओ वेगवेगळे आहेत, असेही प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

चव्हाण म्हणाले की, बर्‍याचशा क्लिपमध्ये वाक्ये अर्धवट आहेत. माझ्या ऑफिसमध्ये येत तेजस मोरेने स्टिंग ऑपरेशन केले असून भिंतीवर भेट म्हणून घड्याळ लावायला दिले होते. त्यात छुपा कॅमेरा बसवल्याचेही प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे तेजस मोरे तुरुंगात होता. तसेच जामीन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत होता. मी कोणाचेही नाव घेतलेले नसून चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली.

घड्याळाने केला घात

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुण्याच्या कार्यालयात झालेले रेकॉर्डींग, स्टींग ऑपरेशन हे भिंतीवरील घड्याळातून केल्याचा खुलासा शनिवारी स्वतः चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. चव्हाण यांचे अशिल तेजस मोरे हा सध्या जेलमध्ये असून त्यानेच मला भेट दिलेल्या घड्याळामध्ये छुपा कॅमेरा बसवल्याची शक्यता चव्हाण यांनी बोलून दाखवली. यापूर्वी तेजस मोरे याने मला कार्यालयासाठी एसी, स्मार्ट टीव्ही देवू केले होते. मात्र मी ते नाकारले. माझ्या कार्यालयात असलेल्या घड्याळात रेकॉर्डींग करण्यासाठी यांत्रिक उपकरण त्यानेच बसवल्याचा दाट संशय मला आहे, असा खुलासाही त्यांनी केला. माझ्या कार्यालयाचा दरवाजा न तोडता चावीनेच दरवाजा उघडल्याचा दावा चव्हाण यांनी करत सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोरे यांचा सहकारी दिसत असल्याचा पुरावा माझ्याकडे असून त्याबाबत पोलिसात तक्रार करणार असून कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -