घरमहाराष्ट्रनाशिकठाकरे गटाच्या मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश

ठाकरे गटाच्या मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश

Subscribe

या मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाही, यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्क पत्रक काढलं आहे. मोर्च्यात विद्यार्थी सहभागी झाले तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा दिला आहे.

नाशिक: ड्रग्ज तस्कर ललित पाटील यांचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर शिवसेना , ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ड्रग्जविरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचं कार्यालय असलेल्या शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असणार आहे. परंतु या मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाही, यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्क पत्रक काढलं आहे. मोर्च्यात विद्यार्थी सहभागी झाले तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा दिला आहे. तर ठाकरे गटाने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चात हजेरी लावण्याचं आवाहन केलं आहे. (Students should not participate in Thackeray group s march Education Officer s order to Nashik School Principle)

खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात 11 वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घ्या, नाहीतर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रक काढले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचं एमआयएम पक्षाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं, त्याच निवेदनाची दखल घेण्यात आली आहे.

- Advertisement -

ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त

संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज मिळत आहेत. पोलिसांना खुले आम हफ्ते दिले जात आहे. कोणाला किती हफ्ते दिले जातात याचा माझ्याकडे कागद आहे. नाशिकच्या आमदारांपासून नांदगावपर्यंत हफ्ते दिले जातात. नाशिकमध्ये जे सुरू आहे ते कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. नाशिक ते मालेगावमध्ये फक्त ड्रग्जच्या व्यापार सुरू असून आर्थिक उलाढाल होते. राजकारणी आणि पोलिसांनी हफ्तेबाजी ही राज्याची स्थिती आणि नाशिक ज्वलंत उदाहरण आहे. कोणाला सोडणार नाही म्हणजे काय? तुमचे हफ्तेबाज आहेत त्यांना का सोडलंय?

(हेही वाचा आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींचा होणार निर्णय )

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -