घरमहाराष्ट्रड्रग्ज प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचे काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...

ड्रग्ज प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचे काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले…

Subscribe

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे प्रकरण गाजल्यानंतर अंमली पदार्थांच्या विक्रीविषयी जोरदार चर्चा व्हायला लागल्याचे पाहायला मिळाले. अंमली पदार्थांच्या विषयावरून राजकीय नाट्य देखील रंगले. परंतु आता या प्रकरणावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या धाडीत अंमली पदार्थ सापडून आले आहेत. ज्यामुळे राज्यात अंमली पदार्थांचे सेवन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे प्रकरण गाजल्यानंतर अंमली पदार्थांच्या विक्रीविषयी जोरदार चर्चा व्हायला लागल्याचे पाहायला मिळाले. अंमली पदार्थांच्या विषयावरून राजकीय नाट्य देखील रंगले. विरोधक आणि सत्ताधारी यांनी या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. परंतु आता या प्रकरणावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. (Sudhir Mungantiwar’s serious allegations against Congress leaders over drugs case)

हेही वाचा – विनायक राऊतांचे निलेश राणेंना आव्हान, म्हणाले – “लोकसभेच्या रिंगणात उतरावे, मग…”

- Advertisement -

ड्रग्ज प्रकरणांबाबत भाष्य करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जी लोकं ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडले नाही पाहिजे, त्यांना ठेचून काढले पाहिजे. यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचे लायस्नस आहेत. त्यांची यादीच माझ्याकडे आहे. मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचे लायसन्स नसले पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारुविक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यांची यादीदेखील आहे, असे थेट आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या आरोपांना काँग्रेसकडून नेमके काय उत्तर देण्यात येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामुळे महाराष्ट्र अंमली पदार्थांचा सर्रास वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ललित पाटील याचा ठाकरे गटाशी संबंध असल्याचेही सांगण्यात येत होता. तसा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना विरोधकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. पण सध्या राज्यातील अंमली पदार्थांचा विषय हा पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला असून या राज्यातील अनेक शहरांतील तरुणाई ही नशेच्या आहारी जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. पण आता मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे खरंच काँग्रेसच्या नेत्यांकडे नशेच्या पदार्थांचे लायसन्स आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -