घरमहाराष्ट्रमहाड तालुक्यात ४८ गावांवर दरड कोसळण्याची भीती

महाड तालुक्यात ४८ गावांवर दरड कोसळण्याची भीती

Subscribe

 स्थलांतरासाठी ग्रामस्थांना नोटिसा

दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील महसूल प्रशासनाने तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भू-वैज्ञानिक विभागाने दरडींचा धोका असलेल्या ४८ गावांची नोंद केली असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.तालुक्यात पारमाची गावात २० वर्षांपूर्वी दरड कोसळली होती. त्यापासून दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. सन २००५ मध्ये तर मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. दासगाव, जुई आणि कोंडिवते या गावात दरडी कोसळल्या होत्या. याचप्रमाणे तालुक्यात विविध ठिकाणी डोंगर भागात दरडी कोसळल्या होत्या. सह्याद्रीवाडी, हिरकणीवाडी या गावांतून तर जमिनीला भेगा पडण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत भू-वैज्ञानिक शाखेकडून तालुक्यातील गावांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये महाडमधील ४८ गावांना दरडीचा धोका असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यानुसार गेली काही वर्षे महाड महसूल प्रशासन या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा म्हणून स्थलांतर करण्यास सांगत आहे. या गावांतून ग्रामस्थांना प्रशिक्षण आणि नोटिसा देण्यात आल्या आहेत.

दासगाव, तुडील, चांढवे, कोंडिवते, मुमुर्शी, कुंबळे, सव, जुई आदी ४८ गावांना या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने आपत्तीजन्य स्थितीत कशी खबरदारी घ्यायची, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण केंद्राकडून प्रशिक्षण दिले आहे. शिवाय या गावांतून मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात येणार्‍या आपत्तीला तोंड कशा प्रकारे द्यायचे याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून या गावांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आली. यात आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समाधान कडू, हर्षद सोनावणे आणि अनिकेत पाटील सहभागी झाले होते.

- Advertisement -

दरडग्रस्तांना आपत्ती काळातील प्रशिक्षण देऊन जनजागृतीसह मार्गदर्शन करण्यात आले आहे.
-प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार

गेली १४ वर्षे शासन दासगावमधील दरडग्रस्तांना पूर्ण पैसे देऊ शकले नाही. ते नोटिसा बजाविण्याच्या पलीकडे काय करणार? एकीकडे नोटिसा बजावल्या जातात, तर दुसरीकडे प्रशासन दरडग्रस्तांना केवळ आश्वासन देत आहे.
-दिलीप उकिर्डे, सरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -