घरमहाराष्ट्रSunil Kedar: 'ललित पाटील प्रकरणाची ही पुनरावृत्ती'; सुनील केदार प्रकरणी भाजपा नेत्याचं...

Sunil Kedar: ‘ललित पाटील प्रकरणाची ही पुनरावृत्ती’; सुनील केदार प्रकरणी भाजपा नेत्याचं मोठं वक्तव्य

Subscribe

सुनील केदार यांची प्रकृती अचानक बिघडणं हे संशयास्पद आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलं आहे.

नागपूर: नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार (Sunil Kedar) यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांची आमदारकीदेखील रद्द करण्यात आली आहे. केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून आता भाजप नेते आशिष देशमुख यांनी ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याचा संशय व्यक्त केला आहे.(Sunil Kedar This repeat of the Lalit Patil case Big statement of BJP leader in Sunil Kedar case Ashish Deshmukh)

काय म्हणाले आशिष देशमुख ?

देशमुख म्हणाले की, 22 तारखेला न्यायालयाने सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्यादिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या बहुतांशी सर्व चाचण्या ते स्वस्थ असल्याचे सांगत असून, या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी. कारण हे जे सगळं सुरू आहे, ते संशयास्पद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

- Advertisement -

सुनील केदार यांना सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्यांनी प्रकृती संदर्भात काही तक्रारी डॉक्टरांकडे केल्या होत्या. त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. छातीतील ईसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

(हेही वाचा: Ashish Shelar : मंबाजी आणि तुंबाजी तर ‘मातोश्री’त शिरलेत… भाजपाचा पलटवार )

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -