घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 : शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी- सुनील प्रभू

Maharashtra Assembly Winter Session 2021 : शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी- सुनील प्रभू

Subscribe

शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात व्हिप जारी करण्यात आला आहे. त्यावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंनी प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आमदारांनी त्या त्या पक्षाच्या प्रतोदच्या वतीने व्हिप जारी करण्यात येतो. दरम्यान व्हिप जारी करणं ही परंपरा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे.

व्हिप जारी करणं ही परंपरा

शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. असा प्रश्न पत्रकारांकडून सुनील प्रभू यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी विधीमंडळाच्या बाहेरील पत्रकरांशी संवाद साधताना सुनील प्रभू म्हणाले की, विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आमदारांना त्या त्या पक्षाच्या प्रतोदच्या वतीने व्हिप जारी केला जातो. आज अधिवेशन काळामध्ये आमदारांनी पूर्ण वेळ सभागृहात सहभागी व्हावं. यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे व्हिप हा प्रत्येक आमदारांना दिला जाणार आहे. व्हिप जारी करणं ही परंपरा आहे. असे आमदार सुनील प्रभू म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम

मुख्यमंत्र्यांवरून सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर नाहीयेत. तर मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. मुख्यमंत्री काल (मंगळवार) कॅबिनेटमध्ये स्वत: हजर होते. उद्धव ठाकरे अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. असे सुनील प्रभू म्हणाले.

दरम्यान, राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज विधिमंडळ अधिवेशाच्या कामकाजाचा पहिलाच दिवस आहे. परंतु पहिल्याचा दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा :Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, ठाकरे सरकारविरोधात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -