घरताज्या घडामोडीशिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरेंवर गोळ्या घालणाऱ्यांना अटक करा, गावकऱ्यांचे जाळपोळ अन् रास्ता...

शिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरेंवर गोळ्या घालणाऱ्यांना अटक करा, गावकऱ्यांचे जाळपोळ अन् रास्ता रोको आंदोलन

Subscribe

पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. डिवरे यांच्या निकटवर्तीयांनी महाविद्यालयासमोर मोठी गर्दी केली.

यवतमाळमधील शिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरेंवर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. डिवरेंच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. महामार्गावर जाळपोळसुद्धा करण्यात आली आहे. यवतमाळ बाजार समितीचे संचालक शिवसेना सुनील डिवरे यांच्यावर अज्ञात तरुणांनी राहत्या घरासमोर गोळीबार करण्यात आला आहे. डिवरे माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा स्थानिक पातळीवरील वजनदार व्यक्ती होते. त्यांच्यावर सकाळी गोळीबारामध्ये ३ गोळ्या लागल्या होत्या.

यवमताळ शिवसेना पदाधिकारी सुनील डिवरेंच्या हत्येनंतर भांब राजा गावातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर टायरची जाळपोळ करत रास्ता रोको आंदोलन केले. डिवरेंच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. सुनील डिवरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असल्याचेही माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

सुनील डिवरेंवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपीला अटक केली नाही. परंतु डिवरेंची हत्या कोणी केली याबाबतची स्पष्ट माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. डिवरे यांच्या निकटवर्तीयांनी महाविद्यालयासमोर मोठी गर्दी केली.

कोण आहेत सुनील डिवरे?

शिवसेना पदाधिकारी सुनील डिवरे यांचा यवतमाळमधील भांब राजा सर्कलमध्ये चांगला दबदबा होता. भांब राजा या गावचे ते सरपंच राहिले आहेत तर त्यांची पत्नी अनुप्रिया डिवरे या सरपंच आहेत. यवतमाळ कृषी बाजार समितीचे संचालक होते.

- Advertisement -

हेही वाचा : गावातील अनुसूचित जातीच्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद, उपसरपंचावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -