घरमहाराष्ट्रविकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार

विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा – शरद पवार

Subscribe

छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यामुळे या विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडेच नाशिकची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. “देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा खोटे आवतन देणाऱ्या या भाजपा सरकारला हद्दपार करा.” असेही त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे,माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार हेमंत टकले,आमदार पंकज भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले पवार

“राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच.” – शरद पवार,राष्ट्रवादीचे अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -