घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? - सुप्रिया सुळे

मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? – सुप्रिया सुळे

Subscribe

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा अधून मधून सुरु असते. दरम्यान, आता चक्क सुप्रिया सुळे यांनीच भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकीय घडोमोडींवर परखड भाष्य केलं.

“आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही. राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही आहे, तर हा पक्षाच एक कुटुंब आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपला सल्ला दिला. महाविकास आघाडी सरकारवर टीका नक्की करा, पण वैयक्तिक टीका करू नये, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला.

- Advertisement -

पुढील १० वर्षांत महाराष्ट्रात राजकारण करणार का? यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्यामुळे महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. तसंच बारामती म्हणजे पवार कुटुंबीय आणि बारामती म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे हे समिकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचं राजकारण आहे

“मला माझे वडील शरद पवारसाहेब आणि आई खूप कमी सल्ले देतात. मी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत गेले होते, तेव्हा बाबांनी सल्ला दिला होता. संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस, ती पायरी चढण्याची संधी तुला लाभली हे तुझं भाग्य आहे. बारामतीच्या लोकांमुळे ही संधी मिळाली आहे. जेव्हा तू बारामतीकरांना विसरशील त्या दिवशी ती पायरी चढता येणार नाही, असा सल्ला बाबांनी दिला होता, तो मी कायम लक्षात ठेवते,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

- Advertisement -

याशिवाय, “महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, हे वास्तव आहे, याची मला जाणीव आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -