घरठाणेदिव्याच्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई

दिव्याच्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई

Subscribe

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणे दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त फारूक शेख यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. त्यांच्यावर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी तत्कालीन सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार असलेल्या अलका खैरे यांची तत्कालीन आयुक्त पाहणी दौऱ्यावर येत आहेत. बांधकामे थांबा अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्याच्या पदावरून हटविण्यात आले. या दोन करवाईवरून दिव्यात अनधिकृत बांधकामांचा भस्मासुर वाढल्याचे दिसत आहे.

कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागात होत असलेल्या अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला असून कळव्यात होत असलेल्या बांधकामांवरुन आमदार आव्हाड यांनी टीव्ट करीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला टार्गेट केले होते. त्यांचे टीव्ट प्रसिध्द झाल्यानंतर काही तासातच महापालिकेचा अतिक्रमण विभागाने कळवा, मुंब्रा, दिव्यासह शहरातील प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत कारवाई सुरु केली आहे. तसेच यासाठी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली आहे. परंतु असे असतांनाच अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या दिव्याचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -